Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

अकोला शेतकरी योजना हप्ता वितरण

अकोला मध्ये शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्याचे वितरण पूर्ण

अकोला जिल्ह्यात 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेअंतर्गत ८व्या हप्त्याची रक्कम १ लाख ८८ हजार २४० शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली.


अकोला मध्ये शेतकरी योजनेच्या ८व्या हप्त्याचे वितरण पूर्ण

अकोला, राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत ८व्या हप्त्याची रक्कम आज (२५ मार्च) जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील एकूण १ लाख ८८ हजार २४० शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून, यासाठी ३६ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. त्यानुसार ८वा हप्ता आज वितरित करण्यात आला.

दरम्यान, हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार १५१ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम मिळालेली नाही, त्यांनी कृषी विभागाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व त्रुटींची पूर्तता केल्यास रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

Loading...

     
     
     

Related to this topic: