Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

३० हजारांची लाच; अकोल्यात कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत अकोल्यातील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात अटक केली आहे.


३० हजारांची लाच अकोल्यात कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Akola Bribery Case |

अकोला (Akola Bribery Case) : शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा ठोस कारवाई करत अकोल्यातील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात अटक केली आहे. जया पांडुरंग इंगोले (वय ४९, रा. महात्मा फुले नगर, मोठी उमरी, अकोला) असे अटकेत घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:२७ ते १२:०४ या कालावधीत पंचायत समिती अकोला येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराने सन २०२४ मध्ये पूर्ण केलेल्या ११० मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २७ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली होती.

या तक्रारीची दखल घेत २८ एप्रिल रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. या तपासात जया इंगोले यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सापळा लावण्यात आला आणि तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र) आणि अपर पोलीस अधीक्षक सतीन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या नेतृत्वात पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

नागरिकांसाठी आवाहन :
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.