Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

अजंता फार्मा पुढाकाराने रिसोडमध्ये 35 बोरवेल (पाणीटंचाईत नागरिकांना मोठा दिलासा)

संपूर्ण रिसोड तालुक्यात तीव्र उन्हाच्या झळा आणि भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.


अजंता फार्मा पुढाकाराने रिसोडमध्ये 35 बोरवेल पाणीटंचाईत नागरिकांना मोठा दिलासा

Ajanta Pharma Initiative |

रिसोड (Ajanta Pharma Initiative) : संपूर्ण रिसोड तालुक्यात तीव्र उन्हाच्या झळा आणि भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असताना, रिसोड शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे अजंता फार्मा मुंबई यांच्या वतीने शहरात बोरवेल खोदून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक भागांतील नागरिकांचा पाण्याचा गंभीर प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघाला आहे.

सध्या रिसोड शहराला आठ ते दहा दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून, शहराबाहेरील नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांमध्ये अद्याप नळपाईपलाईनची सुविधाही उपलब्ध नाही. अशा बिकट परिस्थितीत रिसोडचे मूळ रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध उद्योगपती मन्नालालजी अग्रवाल यांनी पुढाकार घेत आपल्या अजंता फार्मामार्फत 35 बोरवेल खोदण्याचा निर्णय घेतला.

नगरपरिषदेच्या शिफारशी व जनतेच्या मागणीनुसार शहरातील माणिक नगर, गणेश मंदिर परिसर, शिवाजी वसाहत, बाळ समुद्र, अमरदास बाबा संस्थान, अनंत कॉलनी, महानंदा कॉलनी, सखाराम महाराज संस्थान लोणी, न्यायालय परिसर, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत, पिंगलाक्षी देवी परिसर, उत्तमचंद बगडिया महाविद्यालय आदी विविध ठिकाणी बोअर केले असून विशेष म्हणजे, या बहुतांश बोरवेलना भरपूर प्रमाणात पाणी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी 35 बोरवेल करण्याचा संकल्प मन्नालालजी यांचा आहे.

विशेष बाब म्हणजे, यापूर्वी 1995-96 च्या भीषण दुष्काळातही अजंता फार्मातर्फे 40 बोरवेल खोदून रिसोडकरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अग्रवाल परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.

मन्नालालजी अग्रवाल हे मूळचे रिसोडचे रहिवासी असून, आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याच्या भावनेतून ते आरोग्य, शिक्षण, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने समाजोपयोगी कार्य करत असतात. गरजू नागरिकांना वैद्यकीय व इतर वैयक्तिक मदत करण्याबरोबरच संकटकाळात धावून येणारे “संकटमोचक” म्हणून रिसोडकर त्यांच्याकडे आशेने पाहतात.

या उपक्रमामुळे पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शहरभरातून अजंता फार्मा व मन्नालालजी अग्रवाल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: