Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

किसान कृषिरत्न पुरस्काराने डॉ. बाबासाहेब ठोंबरे सन्मानित

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील किसान कृषी विकास प्रतिष्ठानचा यंदाचा ‘किसान कृषिरत्न २०२६’ पुरस्कार लातूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.


किसान कृषिरत्न पुरस्काराने डॉ बाबासाहेब ठोंबरे सन्मानित

Agriculture Award |

लातूर (Agriculture Award) : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील किसान कृषी विकास प्रतिष्ठानचा यंदाचा ‘किसान कृषिरत्न २०२६’ पुरस्कार लातूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येतो. किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे १८ वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता व माहिती व्हावी, या उद्देशाने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी दि. ४ मे रोजी “महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान कृषी विकास प्रतिष्ठान”, गेवराई, जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनादरम्यान डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांना ‘किसान कृषिरत्न २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराबद्दल डॉ. ठोंबरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related to this topic: