Adishakti Muktabai Palkhi: आषाढी वारीनिमित्त आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे बुलढाणा शहरात उत्साहात स्वागत, आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड व नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी सपत्नीक दर्शन घेत महाआरती केली
जुन्या गावात महाआरती; वारकऱ्यांची आ. गायकवाडांकडून सेवा!
बुलढाणा (Adishakti Muktabai Palkhi) : आषाढी वारीनिमित्त आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे बुलढाणा शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) व नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी सपत्नीक दर्शन घेत महाआरती केली.
जुनागाव येथील श्री हनुमान मंदिर संस्थान येथे पालखीच्या मुक्कामादरम्यान वारकऱ्यांसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली. आमदार गायकवाड यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमवेत स्वतः वारकऱ्यांची विचारपूस करून सेवा केली. यावेळी बोलताना आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले, वारकरी संप्रदायामुळेच हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती आजही जिवंत व चिरंतन राहिली आहे. वारी ही समाजप्रबोधन, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची परंपरा आहे.
आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे (Adishakti Muktabai Palkhi) विश्वस्त ह.भ.प. हरणे महाराज यांनी आ. गायकवाड यांनी उभारलेल्या वारकरी भवनाचे कौतुक करत, राज्यातील प्रत्येक मतदारसंघात अशी सुविधा उभारावी, असे मत व्यक्त केले. यावेळी नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे हरिभक्त परायण ह.भ.प. श्री हरणे महाराज, भैय्यासाहेब महाराज पाटील, विशाल महाराज, संदीप गायकवाड, आशिष जाधव यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील भाविक, माता-भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्तिमय वातावरण, ढोल-ताशांचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण बुलढाणा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. आदिशक्ती मुक्ताबाई पालखीच्या स्वागत सोहळ्याने शहरात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमास विविध मान्यवर, वारकरी, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकरी संप्रदायामुळेच हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती आजही जिवंत आणि चिरंतन राहिली आहे." -आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड
जुनागाव येथील श्री हनुमान मंदिर संस्थान येथे मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समवेत आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी स्वतः केली वारकऱ्यांची सेवा
"वारकरी भवन आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी बुलढाणा शहरामध्ये वारकऱ्यांसाठी उभे केले आहे. महाराष्ट्रातील सर्व आमदारांना देखील अशी सद्बुद्धी झाली पाहिजे आणि त्यांनीही आपल्या मतदारसंघात वारकरी भवन उभारावे." — ह.भ.प. श्री हरणे महाराज, विश्वस्त, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान आदिशक्ती मुक्ताबाई चरणी आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड व नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड सपत्नीक नतमस्तक; बुलढाणा नगरीत आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे जल्लोषात स्वागत..!
बुलढाणा, दि. २८ जून : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आदिशक्ती मुक्ताबाई (Adishakti Muktabai Palkhi) यांच्या पंढरपूर वारीसाठी निघालेल्या पवित्र पालखी सोहळ्याचे रविवारी बुलढाणा शहरात आगमन होताच संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "ज्ञानोबा-तुकाराम" च्या अखंड जयघोषात आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे भव्य व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
पालखीचे बुलढाणा शहरात आगमन होताच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) तसेच बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पूजाताई संजय गायकवाड यांनी सपत्नीक आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले आणि पालखीचे भावपूर्ण स्वागत केले. यावेळी संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी (Adishakti Muktabai Palkhi) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करत असून बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरातील प्राचीन श्री हनुमान मंदिर संस्थान येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम ठेवण्यात आला आहे. या मुक्कामादरम्यान वारकरी बांधव, माता-भगिनी तसेच भाविकांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची संपूर्ण व्यवस्था आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात येत असते.

यासोबतच वारकरी बांधवांच्या, विशेषतः माता-भगिनींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या संकल्पनेतून विशेष आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी माता-भगिनींची आरोग्य तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, पायी वारीदरम्यान चालण्यामुळे होणारा शारीरिक त्रास, सांधेदुखी, हाडांचे विकार तसेच पाय व कंबरदुखी यासारख्या समस्यांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी फिजिओथेरपिस्टचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, जुनागाव येथील श्री हनुमान मंदिर संस्थान येथे मुक्कामाच्या ठिकाणी आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी स्वतः वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित राहून वारकरी बांधवांची विचारपूस केली तसेच त्यांच्या आरोग्याची आस्थेने चौकशी करत वारकऱ्यांची सेवा केली. आमदार स्वतः सेवाभावाने वारकऱ्यांमध्ये मिसळल्याने उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) व नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्या हस्ते आदिशक्ती मुक्ताबाईंची महाआरती अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. महाआरतीनंतर उपस्थित वारकरी, भाविक आणि नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
याप्रसंगी बोलताना आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले की, "वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा प्राण आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई यांसारख्या संतांनी समाजाला समता, बंधुता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. वारकरी संप्रदायामुळेच हिंदू धर्म आणि आपली संस्कृती आजही टिकून आहे. हा संप्रदाय केवळ भक्तीचा नाही, तर समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि संस्कारांचा महान वारसा आहे."
ते पुढे म्हणाले, "आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात वारकरी संप्रदाय समाजाला अध्यात्म, संयम, नैतिकता आणि संस्कारांची शिकवण देत आहे. वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी यात्रा नसून ती आत्मशुद्धी, समाजप्रेम आणि मानवतेची शिकवण देणारी परंपरा आहे. वारकरी संप्रदायाने शतकानुशतके समाजात सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे कार्य केले आहे. या महान परंपरेचे संवर्धन आणि जतन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे."
यावेळी आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे (Adishakti Muktabai Palkhi) विश्वस्त ह.भ.प. श्री हरणे महाराज यांनी आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, "वारकरी भवन आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी बुलढाणा शहरामध्ये वारकऱ्यांसाठी उभे केले आहे. महाराष्ट्रातील सर्व आमदारांना देखील अशी सद्बुद्धी झाली पाहिजे आणि त्यांनीही आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये वारकरी भवन उभारावे."
तसेच आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या चरणी शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी, राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक मृत्युंजय संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विठ्ठल कुमरे,धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे हरिभक्त परायण ह.भ.प. श्री हरणे महाराज, भैय्यासाहेब महाराज पाटील, विशाल महाराज खिले, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख आशिष जाधव यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातील भाविक, माता-भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तिमय वातावरण, ढोल-ताशांचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण बुलढाणा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. आदिशक्ती मुक्ताबाई पालखीच्या स्वागत सोहळ्याने शहरात आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.