Hanvatkheda Person Death: हानवतखेडा, हिंगोळी: एक ७५ वर्षीय वृद्ध रामा कचरू जाधव बकरीचे बंधन करत असलेल्या वेळी अचानक लोहखंडी खुंट्यावर पडला. त्याला गंभीर दुखापती झाली
हिंगोली तालुक्यातील हानवतखेडा येथील घटना
हिंगोली (Hanvatkheda Person Death) : तालुक्यातील ७५ वर्षीय वयोवृध्द व्यक्ती बकरी बांधण्याच्या लोखंडी खुंट्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्रावामुळे रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हनवतखेडा येथील रामा कचरु जाधव (७५) हे राहत्या घरी जनावरांच्या गोठ्यामध्ये बकरी बांधत असताना अचानक चक्कर आल्याने लोखंडी खुंट्यावर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तात्काळ हिंगोलीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान १६ ऑगस्टला रात्री ८.४० च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या (Hanvatkheda Person Death) प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात १७ ऑगस्टला विनोद रामा जाधव यांनी दिलेल्या माहिती वरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डि. के. दिघाडे हे करीत आहेत. दरम्यान रामा कचरू जाधव यांच्यावर हनवतखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.