Vidyarambha Summer Camp: हिंगोलीतील ए.बी.एम. इंग्लिश स्कुलमध्ये विद्यारंभ समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. संस्थाध्यक्ष दिलीप बांगर
हिंगोली (Vidyarambha Summer Camp) : अशोक बांगर नगर स्थित ए.बी.एम. इंग्लिश स्कुलमध्ये विद्यारंभ समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. आज पासुन या समर कॅम्पचा आरंभ करण्यात आला आहे. या वेळी संस्थाध्यक्ष दिलीप बांगर, संचालक अजिंक्य बांगर, प्राचार्य रॉबीन वरगीस, उपप्राचार्य सचिन डोईफोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उन्हाळयाची सुट्टीतही हसत खेळत, मज्जा करत विद्याथ्र्यांना शिक्षणाची आवड व्हावी यासाठी या समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. या समर कॅम्पमध्ये फोनिक्स, आर्चरी, कॅलीग्रॅफी, तांयकान्दो, डान्स, मॅजिक शो, बुद्धीमत्ता कौशल्य, आर्ट अॅन्ड क्राफ्ट, डेन्टल चेकअप, झुंबा, इलेक्ट्रीक सेफ्टी अॅन्ड प्रिकॉशन आदी बाबीचा समावेश राहणार आहे.
आज पासुन सुरु झालेल्या 'विद्यारंभ' च्या (Vidyarambha Summer Camp) कार्यक्रमाची सुरवात मान्यवरणाच्या हस्ते ज्ञानदेवता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर श्लोकांच्या मंगल गजरात अक्षरारंभ सोहळा पार पडला. छोट्या विद्यार्थ्यांनी स्लेटवर “श्री” लिहून आपल्या शिक्षण प्रवासाची पवित्र सुरुवात केली. पुढे राष्ट्रगीत व राज्यगीत गायनाने वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. विद्यारंभामध्ये शाळेच्या शिक्षिका प्रियांका श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना फोनीक्सचा उपयुक्त व रंजक वर्ग घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले, ज्यासाठी गोविंद सर आणि संदीप सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. याशिवाय विविध बौद्धिक खेळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देण्यात आली. संपूर्ण शिबिरात विद्यार्थ्यांनी आनंद, उत्साह आणि नव्या गोष्टी शिकण्याचा मनमुराद अनुभव घेतला.
या (Vidyarambha Summer Camp) उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली असून, एबीएम इंग्लिश स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. जास्तीत जास्त बालकांनी या विद्यारंभ समर कॅम्पचा लाभ घ्यावा असे अवाहन ए.बी.एम. इंग्लिीश स्कुलच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.