Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

आरती चांदेकर सम्मानित

आरती चांदेकर मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

आरती चांदेकर मॅडम यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले, त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल.


आरती चांदेकर मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

आरती चांदेकर मॅडम यांना राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुणे येथे सन्मानित...

कोरची (Ideal Teacher Award) : शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी शिक्षक व शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी उत्तम कामगिरी केल्याबद्धल पंचायत समिती कोरची अंतर्गत गट साधन केंद्र कोरचीचे  पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना कु.आरती चांदेकर मॅडम यांना ग.दि.माडगूळकर नाट्यगृह निगडी प्राधिकरण पुणे येथे उपजिल्हाधिकारी शुभम पवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सविता बाबर, शिक्षणाधिकारी कारेकर, जिल्हा परिषद शाळेला जागतिक दर्जावर पोहचविणारे दत्तात्रय वारे, ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष शेंडगे, विदर्भ समन्वयक वशिष्ठ खोब्रागडे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.आरती चांदेकर मॅडम यांनी प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, सोबतच शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत‌.

आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,डाएटचे प्राचार्य बी. जी. चौरे, शिक्षणाधिकारी पवार, वासुदेव भुसे, जिल्ह्यातील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी,आप्तेष्ट मित्रपरिवार व कुटुंबातील सदस्य यांना श्रेय दिले आहे.

आरती चांदेकर मॅडम यांनी निवड श्रेणी प्रशिक्षण,वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण,मूल्यवर्धन प्रशिक्षण,माध्यमिक शिक्षकांचे क्षमतावृद्धी प्रशिक्षण,माझी ई शाळा प्रशिक्षण व अन्य प्रशिक्षणात अतिशय उत्कृष्ट व प्रभावशाली मार्गदर्शन केल्याने दिनांक २९ मार्च २०२६ रोजी ग .दि .माडगूळकर नाट्यगृह निगडी प्राधिकरण पुणे येथे सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे श्रेय पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेश फाये, गटशिक्षणाधिकारी अमित दास , शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक मंदा आवारी, प्रमोदिनी काटेंगे, कांता साखरे, मारोती अंबादे, यांना देण्यात येत आहे. तसेच लोमेश देवांगन यांनी पुरस्कारासाठी खुप सहकार्य केले. आरती महादेव चांदेकर यांचे चांगल्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related to this topic: