MLA Raju Patil Navghare: वसमत येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी झाली. आमदार नवघरे यांनी विविध समस्यांचे तात्काळ निराकरण केले आणि संबंधित विभागांना सूचना दिल्या.
विविध समस्येवर तोडगा
वसमत (MLA Raju Patil Navghare) : वसमत येथे शासकीय विश्राम ग्राहक सोमवारी आमदार राजू पाटील नवघरे यांनी जनता दरबार घेतला या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिक ग्रामस्थ तक्रारी घेऊन आले होते आमदार राजू पाटील नवघरे यांनी नागरिकांच्या समस्या तक्रारीच्या निपटारा केला संबंधित विभागाला सूचना देऊन तक्रार देखील दाखल घेऊन तात्काळ तोडगा काढण्यात या सूचना दिल्या.
आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांनी सोमवारी शासकीय विश्राम गृहात जनता दरबार भरवला होता या जनता दरबारात शहरासह ग्रामीण भागातील महिला अपंग वृद्ध तरुण युवक नागरिक ग्रामस्थ आपल्या समस्या अडचणी घेऊन दाखल झाले होते आमदार नवघरे यांनी सर्वांशी आपुलकीने संवाद साधून संबंधित अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांना सूचना देऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना दिल्या त्यातून अनेक दिवसापासून पाठपुरावा करत असलेल्या नागरिकांना जनता दरबारात दिलासा मिळत असल्याने व आपले प्रश्न सुटल्याने नागरिकांतून जनता दरबाराबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सोमवारी पार पडलेल्या जनता दरबारात घरकुल वीज वितरण महसूल विभाग पोलीस प्रशासन वैद्यकीय सेवा यासह विविध विभागाच्या समस्यांना वाचा फुटली आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. जनता दरबारात तात्काळ समस्या सुटत असल्याने दरवेळी जनता दरबारात समस्या अडचणी घेऊन नागरिक मोठ्या संख्येने येतात.