Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आईचा डब्बा’ उपक्रम

५ वर्षापासून दराडे कुटूंबातर्फे रूग्णांसाठी ‘आईचा डब्बा’ उपक्रम

हिंगोलीतील सचिन दराडे यांनी सुरू केलेल्या ‘आईचा डब्बा’ सेवेने रुग्णांना व नातेवाईकांना मदत केली आहे. या सेवेच्या ५ वर्षे पूर्ण झाली आहेत.


५ वर्षापासून दराडे कुटूंबातर्फे रूग्णांसाठी ‘आईचा डब्बा’ उपक्रम

(Aaicha Dabba) |

हिंगोली (Aaicha Dabba Initiative) : येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी कोरोना महामारीमध्ये रूग्णालयात असलेल्या रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आईचा डब्बा हा उपक्रम (Aaicha Dabba) सुरू केला होता. अद्यापपर्यंत हा उपक्रम सुरू असुन त्याला जवळपास ५ वर्ष पुर्ण झाले आहेत. आता या उपक्रमाने सहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. 

सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांच्यासह कुटूंबीयांनी आईच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिपित्यर्थ आईचा डब्बा  (Aaicha Dabba)  हा उपक्रम सुरू केला. ज्यामुळे हिंगोली जिल्हा शासकीय रूग्णालयात येणार्‍या रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मागणी केल्यानंतर डब्बा आणुन दिल्या जात होता. २ एप्रिलला या उपक्रमाला ५ वर्ष पूर्ण झाले आहेत. दराडे कुटूंबीयांनी आईचा डब्बा (Aaicha Dabba)  देऊन अनेकांच्या भोजनाची गैरसोय टाळली आहे. सचिन दराडे यांनी सामाजिक कार्य करीत असताना आतापर्यंत २७ वेळा रक्तदान केले आहे. त्यामुळे गरजूंना या रक्ताचा लाभ मिळाला आहे. भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबविण्याचा मनोदय सचिन दराडे यांनी केला आहे.

Related to this topic: