Yoga Sakhi Sanstha: कोहाना गावात आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या महत्वाचे प्रबोधन देऊन, कपडे व गृहपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
आदिवासी बांधवाना कपडे व विविध वस्तुचे वाटप
कन्हान (Yoga Sakhi Sanstha) : योग सखी बहुउद्देशीय संस्था व सुजाण सामाजिक बहुउद्देशीय विकास मंच नागपुर व्दारे गाव-कोहाना तालुका. परतवाडा. जिल्हा. अमरावती येथे आदिवासी बंधु भगिनींना कपडे व विविध वस्तुचे वाटप मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
कोहाना गाव हे धारणी रोडवर असुन निसर्गाच्या कुशीत वसलेल आहे. सर्वप्रथम समाज मंदिर येथे गावकरी मंडळींना आमंत्रित करून तेथील प्रमुख श्री बाजीलाल, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर खरपास ,वाजिद भाई तसेच आदिवासी महिलांचा व पुरुषांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. छोटे खानी कार्यक्रमात संस्थेच्या सचिव व सामाजिक कार्यकर्त्या छायाताई कुरुटकर यांनी प्रबोधन करताना सांगितले की आदिवासी मुला-मुलींनी शिक्षण घेणे फार गरजेचे आहे. आपण शिक्षित झाल्यास आपला सर्वांगीण विकास होईल तसेच गावाचा सुद्धा विकास होईल.
सुजाण सामाजिक बहुउद्देशीय विकास मंचचे अध्यक्ष त्र्यंबक मोकासरे व सचिव राजेश हाडके यांनी आदिवासी बांधवांना शिक्षणाचे व संविधानाचे महत्त्व पटवुन दिले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर खरपा स यांनी आरोग्य विषय माहिती दिली. याप्रसंगी मदन नागपुरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रांतिय महासचिव शरद वानखेडे यांनी सूत्रसंचालन व सामाजिक प्रबोधन केले. कोहाना येथील अंगणवाडीच्या प्रांगणात आदिवासी भगिनींना साड्या, सलवार सूट, वन पीस व गृहपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले. बांधवांना शर्ट,पॅन्ट, जॅकेट, कोट आदीचे वाटप करण्यात आले.
लहान मुला, मुलींना पाणी बॉटल, शर्ट, पॅन्ट, जीन्स पॅन्ट इत्यादीचे वाटप सह उपस्थित सर्व मुला, मुलींना खाऊचे वाटप करण्या त आले. खेळी मेळीच्या वातावरणात छोटेखानी कार्य क्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता योग सखी व सुजाणचे पदाधिकारी छाया वानखेडे, मेघा फेंडर, माधुरी लाडेकर, श्वेता खाइवले, सुनंदा मोकासरे, रेखा कन्नाके, मनिषा बोरकर, विद्या लडके, कांचन राऊत, प्रियंका साठवणे, पुष्पा बनकर, योगिता कारेमो रे, निशा हटकर, संगिता नागपुरे, प्रतिभा वाणी, मीरा मदनकर, प्रविण बालपांडे, कैलास कुरुटकर, उमाकांत राऊत, नारायण लडके, निषाद कुरूटकर, आदित्य वानखेडे, मोनु राऊत आदींनी परिश्रम घेतले.