शहरातील पालिकेच्या गाळे व जमिनींच्या भाड्यघाची तब्बल २ कोटी ९८ लाख रूपयांची थकबाक असल्याने बीड नगरपालिकेने मंगळवारी धडक कारवाई करत पालिकेसमोर ६ गाळे सील केले.
बीड/जालना (Beed Municipality) : शहरातील पालिकेच्या गाळे व जमिनींच्या भाड्यघाची तब्बल २ कोटी ९८ लाख रूपयांची थकबाक असल्याने बीड नगरपालिकेने मंगळवारी धडक कारवाई करत पालिकेसमोर ६ गाळे सील केले. या कारवाईनंतर तीन गाळेधारकांनी तातडीने थकत रक्कम भरल्याने त्यांची दुकाने पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात आली.
बीड शहरात नगरपालिकेचे (Beed Municipality) एकूण १० व्यापारी कॉम्प्लेक्स असून त्यामधील ४७३ गोळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ३०० गाळेधारकांनी मागील १ ते १० वर्षांपासून गाळेभाडे व मालमत्ता कर भरलेला नाही.
तसेच पालिकेच्या (Beed Municipality) मालकच्या काही मोकळ्या जागाही भाडेतत्त्वावर देण्यात आल्या असून त्याचेही भाडे मोठ्या प्रमाणात थकलेले आहे. सर्व मिळून पालिकेचे २ कोटी ९८ लाख रूपयांची थकबाक आहे. सात दिवसांपूर्वी नगरपालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत.