मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत लागवड केलेल्या १ एकर शेतात दि. १५ मार्च रोजी अज्ञात इसमाने आग लावल्याने आंबा झाडे जळून खाक झाली आहेत.
मानोरा (Mango Trees Fire) : धामणी (मानोरा) शिवारातील गट क्रमांक २१ मधील मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत लागवड केलेल्या १ एकर शेतात दि. १५ मार्च रोजी अज्ञात इसमाने आग लावल्याने आंबा झाडे जळून खाक (Mango Trees Fire) झाली आहेत. यासंदर्भात न्याय द्यावा व नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन नुकसानग्रस्त शेतकरी नीरज सुधीर पाटील यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व ठाणेदार यांना दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, मनरेगा फळबाग योजनेअंतर्गत एका एकर शेतात मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग आंबा झाडांची लागवड शेतकरी नीरज पाटील यांनी केली आहे. १५ मार्च रोजी अज्ञात इसमाने १ एकर आंबा फळबाग लागवड असलेल्या शेतात जाणूनबुजून (Mango Trees Fire) आग लावल्यामुळे शेतीमधील आंब्याची झाडे जळून खाक झाली आहे. संपूर्ण फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नुकसानीचा पंचनामा करून शासनाची नुकसान भरपाई द्यावी व जाणूनबुजून आग लावणाऱ्या अज्ञात इसमाविरुध्द कार्यवाही करावी असे निवेदन बाधीत शेतकऱ्यांनी दिले आहे.