Little Girl Death: महाराष्ट्रातील रिसोडमध्ये 10 वर्षीय अश्विनी चौधरी खेळताना झोक्याला लागलेल्या गळफासामुळे मृत्यू झाला.
रिसोड (Little Girl Death) : झोका खेळत असताना दोरीचा गळफास लागून एका दहा वर्षीय चिमुकलीचा जीव गेल्याची घटना दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 1 वाजता महात्मा फुले नगर विश्वा लॉन च्या मागे घडली. अश्विनी राजू चौधरी वय 10 वर्ष असे मृतक चिमुकलीचे नाव असून या घटनेनंतर चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला व या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, अश्विनी ही घराच्या पाठीमागे लाकडाला बांधलेल्या झोक्याला एकटीच खेळत होती. दुपारची वेळ असल्याने या परिसरात अक्षरशा सन्नाटा होता. पुरुष हे आपल्या कामानिमित्ताने बाहेर गेले होते तर काही महिला व मुले हे घरातच होती.
अश्विनी ही (Little Girl Death) झोका खेळत असताना तिला दोरीचा गळफास बसला ही बाब शेजारच्या एका महिलेला समजली. सदर महिलेने ताबडतोब धावत येत अश्विनी ची आई व अन्य नागरिकांना याबाबत माहिती दिली. तिला लगेच आजूबाजूच्या नागरिकांनी धावत येत दोरी चा गळफास काढून ताबडतोब रिसोड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.अश्विनी महात्मा फुले नगर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेतील चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. अतिशय हुशार बोलकी असल्याने ती शाळेत सगळ्याच्या परिचयाची होती. अश्विनीला एक भाऊ व एक बहीण आहे. तिच्या जाण्याने चौधरी परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात आला संध्याकाळी तिचा अंतिम संस्कार करण्यात आला. वृत्तलिहेपर्यंत सदर प्रकरणी तक्रार दाखल झाली नाही.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारच्या वेळी नागरिक आपल्या घरातच राहणे पसंत करत असतात.अशातच लहान मुले बाहेर खेळत असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे हे या (Little Girl Death) घटनेतून समजते. लहान मुले खेळत असताना ऊन, वारा, पाऊस, थंडी याकडे गांभीर्याने बघत नाहीत. यामुळे नागरिकांनी लहान मुलावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे