Girl Abuse Case: चान्नी ठाणे हद्दीत ५५ वर्षीय एक व्यक्तीने १० वर्षीय मुलीवर अत्याचार केला. गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
चान्नी ठाणे हद्दीतील संतापजनक घटना
पातूर (Girl Abuse Case) : तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ५ मे) दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील रोजंदारीसाठी शेतात जात असल्याने मुलगी घरात एकटी राहत होती. (Girl Abuse Case) याचाच गैरफायदा घेत आरोपीने गेल्या आठवडाभरापासून मुलीला पैशांचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. सोमवारीही आई-वडील शेतात असताना आरोपीने घरात घुसून पुन्हा अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
भीतीपोटी मुलीने आतापर्यंत हा प्रकार लपवून ठेवला होता. मात्र सोमवारी तिने आई-वडिलांना घडलेली घटना सांगितली. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ मुलीला घेऊन चान्नी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मुलीचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
मुलगी गंभीर; आरोपी फरार
अत्याचारामुळे मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. घटना उघडकीस येताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी चान्नी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
️गावात भीतीचे वातावरण
या (Girl Abuse Case) घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अल्पवयीन मुली व त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त ग्रामस्थांकडून आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
राज्यातील घटनांच्या पार्श्वभूमीवर संताप
राज्यात अलीकडेच घडलेल्या नसरापूर येथील घटनेमुळे राज्यात त्रिव संताजी लाट असताना पातुर तालुक्यात सुद्धा अशीच घटना घडली असून अशा नराधमांना थेट फाशीवर लटकवण्याची मागणी जोर धरत आहे. अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा गुन्ह्यांमध्ये दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच अशा नराधमांना कडक शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.