T20 Cricket Tournament: आंतरप्रेस टी-20 क्रिकेट स्पर्धेत देशोन्नतीची पुण्यनगरीवर मात
संदीप गाणारची नाबाद अर्धशतकी खेळी
देशोन्नती वृत्तसंकलन नागपूर (T20 Cricket Tournament) : सामनावीर संदीप गाणारच्या (Sandeep Ganar) नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर (Deshonnati) देशोन्नती संगाने (Sports Journalists Association) स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (SJAN) तर्फे आयोजित 25 व्या (T20 Cricket Tournament) आंतरप्रेस टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुण्यनगरीचा (Punyanagari) चार गड्यांनी पराभव केला.
वसंतनगर मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुण्यनगरीचा डाव 18.3 षटकांत अवघ्या 118 धावांमध्ये आटोपला. दीपक मानेने तीन चौकार व एका षटकारासह 31 चेंडूत 39 व सलामवीर श्रीकांत कोटगुळेने 30 धावा (22 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) केल्या. सम्राट गोटेकर व शुभम बोरघरेने प्रत्येकी तीन आणि रोशन भुसारीने दोन गडी बाद केले.

देशोन्नतीने 119 धावांचे विजयी लक्ष्य 15.3 षटकांतच सहा गडी गमावून सहज गाठले. सलामीवीर (Sandeep Ganar) संदीप गाणारने ११ चौकारांच्या मदतीने 46 चेंडूत नाबाद 80 धावा ठोकून संघाला पहिला विजय मिळवून दिला. दीपक माने व पंकज पांडेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (Raisoni Group) रायसोनी समूहाचे जनसंपर्क अधिकारी अमित गंधारे यांच्या हस्ते संदीपला सामनावीर पुरस्कारने गौरविण्यात आले. आज (T20 Cricket Tournament) शुक्रवारी टाइम्स ऑफ इंडिया आणि नवभारत यांच्यात सामना खेळला जाणार आहे.