कोल्हापूरच्या रोहन पवारने पुण्याच्या रामा कांबळेला

Kolhapur Rohan Pawar: चुरशीच्या लढतीत कोल्हापूरच्या रोहन पवारने पटकावला महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी किताब!

लातूर (Kolhapur Rohan Pawar) : कोल्हापूर येथील रोहन पवार (Kolhapur Rohan Pawar) आणि पुण्याचा रामा कांबळे यांच्यातील चुरशीच्या लढतीत रोहन पवार याने ११ अंकाने राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी हा खुल्या गटातील किताब मिळविला. सव्वा लाख रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक – दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) च्या पवित्र यज्ञ भूमीवर विश्वातील एकमेव मानवतातीर्थ भवनाच्या विशाल प्रांगणात अभूतपूर्व राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १९ वर्षापासून भरविण्यात येत आहेत. या स्पर्धेत पुण्याचा रामा कांबळे यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये १ लाखाचे पारितोषिक देण्यात आले. कोल्हापूर येथील सुशांत तांबुळकर याला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५० हजार रोख व कांस्य पदक देण्यात आले. चतुर्थ क्रमांकावर पुणे येथील सागर देवकाते याला २५ हजार रुपये रोख व पदक देण्यात आले.

height=576

या (Kolhapur Rohan Pawar) स्पर्धेत एकूण २५० पेक्षा अधिक मल्लांनी भाग घेतला होता. हिंदी केसरी दिनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा, कराड, आ. रमेशअप्पा कराड, डॉ. हनमंत कराड, श्री. राजेश कराड, पै. विष्णूतात्या जोशीलकर, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, बापू साहेब मोरे, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व प्रा. विलास कथुरे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिक देण्यात आले. या वेळी पै. राहुल बिराजदार आणि पै. निखील वणवे हे उपस्थित होते.

वजन गटातील विजेते पुढील प्रमाणे – प्रथमः सुवर्ण पदक, द्वितीय रौप्य पदक, तृतिय कांस्य पदक, व रोख रक्कम पुढे दिल्या प्रमाणे वजन गट प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चुतर्थ क्रमांक रक्कम २०,०००; १५,०००; १०,०००; ८,००० याप्रमाणे ८६ किलो शुभम मगर, पुणे गौतम शिंदे, सोलापूर तुषार लवटे, लातूर तुषार झंजे सोलापूर ७४ किलो नामदेव कोकाटे, पुणे सोमनाथ शिंदे, करमाळा तेजस गोफणे सातारा समाधान भोसले धाराशिव ७० किलो शनि निंबाळकर, पुणे कुलदीप पाटील, कोल्हापूर महेश तातपुरे, रामेश्वर तुषार खामकर, पुणे ६५ किलो अविराज माने, सोलापूर चेतन भंडारी, रामेश्वर किरण सगे, पुणे बाळासाहेब चौरे, रामेश्वर ६१ किलो आविष्कार गावडे, पुणे अनिकेत पाटील, कोल्हापूर दिपक पवार, पुणे नारायण दहिफळे, रामेश्वर ५७ किलो आकाश सलगर, सोलापूर अजय निंबाळकर, पुणे लकी खरात, पुणे अनिकेत क्षिरसागर, बीड ७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. या पैकी कोंड येथील शिवाजी गणपत मोरे हे विजेते ठरले तर कमलाकर माणिकराव मुळे हे उपविजेते ठरले.

या (Kolhapur Rohan Pawar) पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्य सेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा स्मृती सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, मानवतातीर्थ भवन रामेश्वर रुई च्या मातीतून आज ना उद्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू निर्माण होतील. भारताच्या कुस्तीक्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या क्रीडा प्रकारात आपले मन आणि मनगट मजबूत होते. आजच्या तरुणांनी कुस्तीकडे वळणे गरजेचे आहे. श्री. बाबा निम्हण यानी स्पर्धेचे सूत्रसंचलन व धावते वर्णन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.