Latur Congress 'SIR' Campaign: लातूर जिल्ह्यात काँ

लोकशाही व संविधान रक्षणासाठी सज्ज व्हा; रेहाना चिश्ती यांचा एल्गार

Latur Congress 'SIR' Campaign

लातूरमध्ये काँग्रेसच्या 'एसआयआर' मोहिमेचा आढावा

लातूर (Latur Congress 'SIR' Campaign) : आज देशातील लोकशाही आणि संविधान मोठे आव्हान पेलत आहे. सर्वसामान्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्या ऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशा या कठीण काळात काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने खंबीरपणे रस्त्यावर उतरणे ही काळाची गरज आहे. लोकशाही व संविधान रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव रेहाना चिश्ती यांनी केले. लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणी आणि 'मतदार यादी विशेष पडताळणी मोहिमेला'(SIR) मोठी गती दिली आहे. याच अनुषंगाने, लातूर शहर व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि२८) लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये आठव्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा प्रभारी मा.श्री. बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.  या (Latur Congress 'SIR' Campaign) बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रेहाना चिश्ती म्हणाल्या, "निवडणुकीतील विजयाचा खरा पाया बूथ पातळीवर रचला जातो. त्यामुळे प्रत्येक बी.एल.ए. आणि कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन मतदार याद्यांची अत्यंत काटेकोरपणे पडताळणी करावी. कोणाचेही नाव वगळले जाणार नाही आणि प्रत्येक पात्र मतदाराला त्याचा हक्क मिळेल, यासाठी डोळ्यात तेल घालून काम करा," असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या (Latur Congress 'SIR' Campaign) बैठकीत मार्गदर्शन करताना रेहाना चिश्ती म्हणाल्या, "लातूरमध्ये नुकताच झालेला हा कॅन्डल मार्च अत्यंत यशस्वी ठरला. यातून जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास आणि आ. अमित देशमुख यांच्या खंबीर नेतृत्वाची प्रचिती येते. या शानदार आणि यशस्वी नियोजनाबद्दल मी आ. अमित देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते." या मार्चमुळे लातूर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एक मोठी ऊर्जा निर्माण झाल्याचे आणि जनतेमध्ये एक सकारात्मक संदेश गेल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लातूर जिल्हा प्रभारी मा.श्री.बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रगल्भ मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना आगामी लढ्यासाठी सज्ज केले. ते म्हणाले की, "काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांचा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा पक्ष राहिला आहे. आज राज्यामध्ये आणि देशामध्ये जे द्वेषाचे आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्याला केवळ काँग्रेसचा सर्वसमावेशक विचारच चोख उत्तर देऊ शकतो. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे." बैठकीच्या सुरुवातीला शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याचा सविस्तर अहवाल मांडला. यावेळी जिल्हाध्यक्ष-अभय साळुंके यांनी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाची आठवण करून दिली व आगामी काळात संघटनात्मक पातळीवर पक्षाला आणखी बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. दिनेश नवगिरे यांच्याकडून 'एसआयआर' मोहिमेचा सविस्तर आढावा मांडण्यात आला.