घटस्फोटानंतर ६ वर्षांनी बादशाहचे ईशा रिखीसोबत लग
चर्चांना उधाण
Badshah Wedding : गायक-रॅपर बादशाह याने पंजाबी अभिनेत्री व मॉडेल ईशा रिखी हिच्यासोबत लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. अलीकडेच ईशाच्या आई पूनम यांनी काही छायाचित्रे शेअर केली असून, त्यावरून दोघांचे लग्न झाल्याचे संकेत मिळत आहेत. बादशाह आणि ईशा मागील जवळपास चार वर्षांपासून एकमेकांसोबत नात्यात होते. एका समान मित्रामार्फत समारंभात त्यांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, अशी माहिती समोर येत आहे.
ईशा रिखी ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील ओळखली जाणारी अभिनेत्री असून, तिने 2013 मध्ये "जट्ट बॉईज पुट्ट जट्टन दे" या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात सिप्पी गिल आणि ओम पुरी यांचीही प्रमुख भूमिका होती. यानंतर तिने 2018 मध्ये "नवाबजादे" या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात वरुण धवन, राघव जुयाल आणि पुनीत पाठक हे कलाकारही झळकले होते.