UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्याची IPL मध्ये दमदार एंट्री!
नवी दिल्ली (IPL 2026 Abhinandan Singh) : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यासाठी आपल्या संघात एक आश्चर्यकारक बदल केला. या हंगामातील अगदी पहिल्याच सामन्यात, गतविजेत्या संघाने (Abhinandan Singh) अभिनंदन सिंगला इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पदार्पण करण्याची संधी दिली.
ही सुद्धा बघा: विराट कोहलीने रचला इतिहास
अभिनंदन सिंगचे IPL पदार्पण
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात मैदानावर अनेक मोठी नावे दिसली असली तरी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) च्या जर्सीवर एक असा चेहरा होता, ज्याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या अभिनंदन सिंगने (Abhinandan Singh) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने बिहारचा सुपुत्र इशान किशनची (Ishan Kishan) विकेट घेतली.
UPSC परीक्षेची तयारी करताना क्रिकेटची आवड
अभिनंदन सिंगची (Abhinandan Singh) कहाणी बहुतेक क्रिकेटपटूंपेक्षा वेगळी आहे. तो दिल्लीत राहून (UPSC) यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. क्रिकेटची आवड जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्याने दिल्लीतील मुलांना खाजगी शिकवणीसुद्धा दिली. वयाच्या सुमारे 29 व्या वर्षी, जेव्हा अनेक खेळाडू निवृत्तीचा विचार करू लागतात, तेव्हा अभिनंदनने आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि स्वप्न पाहण्यासाठी वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले.
ईशान किशनची (Ishan Kishan) विकेट घेऊन, अभिनंदनने तेच केले, ज्याची आरसीबीला सर्वाधिक गरज होती. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या आणि आक्रमकपणे फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनला बाद करून त्याने आपल्या संघाला मोठा दिलासा दिला. फिल सॉल्टने घेतलेल्या एका अप्रतिम एकहाती झेलमुळे ही विकेट मिळाली असली तरी, धावफलकावर अभिनंदनचे नाव नोंदवले गेले होते.
अभिनंदन (Abhinandan Singh) हा दिल्लीच्या प्रसिद्ध मद्रास क्लबचा खेळाडू आहे, ज्या क्लबने युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि पवन नेगीसारखे स्टार खेळाडू घडवले आहेत. यावेळी त्याचे प्रशिक्षक रणधीर सिंग भावूक झाले आणि म्हणाले की, अभिनंदनच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. (BCC) बीसीसीआयच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत न खेळता आयपीएलच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. त्याच्या हाय-आर्म ॲक्शनमुळे सपाट खेळपट्ट्यांवर त्याला अतिरिक्त उसळी मिळते, ज्यामुळे तो घातक ठरला.