Deputy CM Eknath Shinde: परभणीत इंदिरा गांधी क्रीड

परभणीतील शेतकरी संवाद मेळावा पुढे ढककला; उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा रद्द

Deputy CM Eknath Shinde

खा. संजय जाधव यांची माहिती, कार्यकर्त्यांमध्ये निराशा

परभणी (Deputy CM Eknath Shinde) : येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे मंगळवार ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीतील शेतकरी संवाद मेळावा त्यांच्या प्रकृती अस्वस्थेमुळे पुढे ढकलण्यात आला असून त्यांचा दौराही रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती खा. संजय जाधव यांनी दिली. दौर्‍याची व मेळाव्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद मेळाव्याची मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. मेळाव्यासाठी विविध तालुक्यांतून हजारो शेतकरी उपस्थित राहणार होते. कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे व्यासपीठ, सभा मंडप उभारण्यात आले होते. मात्र अचानक दौरा रद्द झाल्याने सर्व तयारीला ब्रेक लागला आहे.

या (Deputy CM Eknath Shinde) मेळाव्यादरम्यान विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार होता. मात्र दौरा पुढे ढकलल्याची माहिती मिळताच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मेळाव्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार कार्यक्रम पुन्हा आयोजित केला जाणार असल्याची माहिती खा.संजय जाधव यांनी दिली आहे.