Maharashtra Bandh 2026: दिल्ली येथील विद्यार्थी आं

उद्याच्या महाराष्ट्र बंदला व्ही. एस. पँथर्सचा पाठिंबा!

Maharashtra Bandh 2026

लातूरकरांनी बंद मध्ये सहभागी व्हावे: विनोद खटके

लातूर (Maharashtra Bandh 2026) : दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनावर दिल्ली पोलिसांच्या वतीने अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या उद्या दिनांक 23 जुलै च्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा देत या बंदमध्ये लातूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांनी केले आहे. खटके यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेतली. तसेच त्यानंतर पत्रक काढून जाहीर पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यातील सर्व व्यापारी संस्थान, शैक्षणिक संस्था बंद ठेवून या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवावा, असे आवाहन विनोद खटके यांनी केले आहे.  या बैठकीला प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन मस्के मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे, ग्रुप अध्यक्ष अमोल कांबळे, संपर्कप्रमुख आनंद जाधव, विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रीतम दंडे, जिल्हाध्यक्ष शरद किणीकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. किरण पायाळ, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे, ऑटो युनियन जिल्हाध्यक्ष देवा गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अकबर शेख, शहराध्यक्ष असद शेख, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष शाहरुख मणियार , कामगार आघाडी शहराध्यक्ष गौस शेख, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड, ऑटो युनियन शहरअध्यक्ष जगदीश सरवदे, जिल्हा संघटक गोविंद कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.