Maharashtra Heavy Rainfall: मुंबईसह पश्चिम महाराष

महाराष्ट्रात पावसाला ब्रेक; पुढील 10 दिवस पावसाचा जोर कमी

Maharashtra Heavy Rainfall

मुंबई ( Maharashtra Heavy Rainfall) : जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला असला, तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या (Maharashtra Heavy Rainfall) काळात राज्यातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घटजुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर),…

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 7, 2026

याशिवाय, पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार (Maharashtra Heavy Rainfall) जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.

दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला असून, ज्या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.