Nitin Gadkari: इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत सध्या दे

इथेनॉल पेट्रोलच्या वादात गडकरींचे स्पष्ट वक्तव्य; वाहनधारकांना दिला महत्त्वाचा सल्ला

Nitin Gadkari

नवी दिल्ली (Nitin Gadkari) : इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. इथेनॉलमुळे इंजिन खराब होत असल्याचा दावा काही वाहनचालकांकडून करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं कोणतंही नुकसान होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ज्यांना इथेनॉल मिश्रित पेट्रोल नको आहे. त्यांच्यासाठी शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध असून त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील,असंही त्यांनी सांगितलं. देशाने २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता सर्व पेट्रोल पंपांवर E20 उपलब्ध आहे. त्यामुळे पुन्हा E10 चा पर्याय देणे व्यवहार्य नाही, अशी प्रतिक्रियाही (Nitin Gadkari) त्यांनी दिली. पुढे बोलताना ते (Nitin Gadkari) म्हणाले, सोशल मीडियावर E20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत विविध दावे आणि अफवा पसरल्या जात आहेत. सरकारी तेल कंपन्यांनीही खबरदारी घेतली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल पंपांवर इंधनाच्या गुणवत्तेची तपासणी करत आहेत. तसेच, ग्राहकांनी कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास ती थेट पेट्रोल पंप किंवा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे नोंदवता येते. असंही त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, आयआयटी कानपूरच्या संशोधनातूनही E20 पेट्रोलबाबत सकारात्मक निष्कर्ष समोर आला आहे. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये E20 मुळे इंजिन खराब होणे, गंज येणे किंवा इतर तांत्रिक बिघाड झाल्याचे कोणतेही पुरावे आढळला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच वाहनाच्या मायलेजमध्ये होणारा बदल हा प्रामुख्याने वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि वाहनाच्या देखभालीवर अवलंबून असतो, इंधनावर नाही, असेही (Nitin Gadkari) संशोधकांनी स्पष्ट केले आहे.