Sonam Wangchuk hunger strike: ज्येष्ठ पर्यावरणवादी

सोनम वांगचुक यांच्याशी केंद्राने चर्चा करावी, अन्यथा सोमवारी लाक्षणिक उपोषण

Sonam Wangchuk hunger strike

'आम्ही लातूरकर'चा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

लातूर (Sonam Wangchuk hunger strike) : ज्येष्ठ पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर "आम्ही लातूरकराच्यावतीने गुरुवारी पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी, लातूर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात केंद्र सरकारने उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्याशी तातडीने चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, संवादातून प्रश्न सोडविणे हेच लोकशाहीचे खरे वैशिष्ट्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सोनम वांगचुक (Sonam Wangchuk hunger strike) यांच्या प्रकृतीची खालावत चाललेली स्थिती लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी केंद्र शासनाने प्रतिष्ठेचा प्रश्न न बनविता तातडीने चर्चेचा मार्ग स्वीकारून त्यांचे उपोषण मागे घेण्यास पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने सोनम वागचूक यांच्या उपोषणाची गांभिर्याने दखल न घेतल्यास 20/07/2026 सोमवारी महात्मा गांधी चौक लातूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या मान्यवरांची उपस्थिती... जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रामुख्याने अँड. उदय गवारे, माधव बावगे, रमेश बिरादार प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा. दत्ता सोमवंशी अॅड. धनंजय झाडके, डॉ. गणेश गोमारे, प्रा. अर्जुन जाधव, अॅड. जे. एच शेख, अँड. गणेश यादव, सुनील कदम, विश्वंभर भोसले अँड. भालचंद्र कवठेकर, धर्मराज पाटील, बाळासाहेब यादव, खंडेराव गंगणे, लता बावगे, मीरा देशमुख, अँड. गजेंद्र येळकर, सोहम कवठेकर, प्रा. दशरथ भिसे, अँड. सुशील सोमवंशी, अँड. रामराजे आत्राम, अनिल दरेकर, उत्रेश्वर बिराजदार, अनिता मुदगले, रुकसाना मुल्ला, रंजना हसुरे' जयश्री कदम, सहारा शेख, अर्चना पाटील' जमील नाना शेख महेश माने आदी उपस्थित होते.