Dharmendra Pradhan Resignation: NEET-UG पेपरफुटी प

'हा लोकशाहीचा विजय'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया

Dharmendra Pradhan Resignation

शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय, CJP आणि Gen Z यांचे अभिनंदन: सोनम वांगचुक

नवी दिल्ली (Dharmendra Pradhan Resignation) : NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resignation) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाला "लोकशाहीचा विजय" असे संबोधत आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी, नागरिक आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांचे अभिनंदन केले.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी म्हटले की, "हा लोकशाहीचा विजय आहे. शांतता, संयम आणि चिकाटीचा हा विजय आहे. CJP, देशातील Gen Z तरुण आणि भीतीवर मात करून आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे अभिनंदन. आता केवळ जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा होणे आवश्यक आहे." त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

IT'S A VICTORY OF DEMOCRACYdirect democracy... straight from the streets.It's a victory of peace, patience & persévérance.Congratulations CJP, Gen Z of the nation and thank you all citizens for shedding fear and the fear of fear and rising up from every corner of the nation.… pic.twitter.com/rSLOfvba2R

— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 25, 2026

दरम्यान, NEET-UG पेपरफुटीच्या आरोपांवरून गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलन सुरू होते. आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resignation) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी होती.

This is democracy. He has resigned. We have two more demands. We won't go like this.Dharmendra Pradhan has resigned. But the families of the children who committed suicide should receive compensation of one crore rupees. They should get it. One crore rupees compensation to all… pic.twitter.com/CyhfGDUola

— Cockroach is Back (@Cockroachisback) July 25, 2026

धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resignation) यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याची माहिती दिली. देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या खुल्या पत्रात नमूद केले. तसेच सरकार आणि CJP यांच्यातील पुढील चर्चेपूर्वीच हा निर्णय जाहीर झाल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

pic.twitter.com/VSArqS98OJ

— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 25, 2026