'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधी यांचे अमित शाहांना थेट पत्र
नवी दिल्ली (Rahul Gandhi) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून, 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या पोलीस कारवाईवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधींनी आरोप केला आहे की, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त बळाचा वापर करण्यात आला.
राहुल गांधींनी विचारले आहे की, विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला. त्यांनी विचारले की, गृह मंत्रालयाने विद्यार्थ्यांवर पेलेट गन आणि अश्रुधूर वापरण्यास मंजुरी दिली होती का? राहुल गांधींनी या संपूर्ण प्रकरणात उत्तरदायित्वाची मागणी केली आहे.
Pellet guns, lathis and tear gas were used against students peacefully protesting in Delhi.I met 19-year-old Sahil Lochab. Shot with pellets, he may lose an eye. His “crime”? Demanding an end to paper leaks and a fair future for our students.@AmitShah ji, I have two… https://t.co/861NLmRgNp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 26, 2026राहुल गांधींनी अमित शाह यांना लिहिले पत्र
25 जुलै रोजीच्या आपल्या पत्रात राहुल गांधींनी म्हटले आहे की, लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि संवादातून तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, "शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही. त्यांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे आणि या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे."
शांततापूर्ण आंदोलन (CJP) ही कोणत्याही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद असते. आंदोलन करणाऱ्यांचे संरक्षण करणे आणि संवादाद्वारे त्यांचे म्हणणे ऐकून घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु झालेल्या हिंसाचाराने लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला आहे. देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांना उत्तरे हवी आहेत. त्यांना जाणून घ्यायचे आहे की यासाठी जबाबदार कोण आहे.
संपूर्ण आंदोलनातील हृदयदायक काळ
हे (Rahul Gandhi Investigation) आंदोलन कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) बॅनरखाली सुरू झाले. आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते अभिजीत दीपके (Abhijit Deepke) यांनी मे महिन्यात एक व्यंगात्मक ऑनलाइन मोहीम म्हणून याची सुरुवात केली. नंतर नीट पेपरफुटी (NEET paper leak) प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणाऱ्या देशव्यापी विद्यार्थी आंदोलनात याचे रूपांतर झाले. 20 जून रोजी जंतर मंतर येथे धरणे आंदोलन सुरू झाले. 28 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी सहा 'आयसा' (AISA) कार्यकर्त्यांसह अनिश्चित साठी उपोषण सुरू केले. गुरुवारी रात्री केंद्र सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.
20 जुलै रोजी, सरकार आणि CJP नेतृत्वाची पहिली औपचारिक बैठक भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या निवासस्थानी झाली. त्याच दिवशी संसदेच्या मोर्चादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईमुळे देशभरातून या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला. त्यानंतर, 25 जुलै रोजी दुपारी धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. कॉकरोच जनता पार्टीच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत आणि आंदोलन संपले आहे.