SBI कार्डधारकांना मोठा झटका! 1 जुलैपासून रिवॉर्ड पॉइंट्समध्ये मोठी कपात
मुंबई (Credit Card Updates) : एसबीआय कार्डने या प्रीमियम को-ब्रँडेड क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड सिस्टीममध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. हे नवे नियम 1 जुलै 2026 पासून लागू होणार असून, त्यामुळे कार्डधारकांना मिळणारे अनेक फायदे कमी होणार आहेत.
युटिलिटी बिल पेमेंटवरील रिवॉर्ड्समध्ये कपात
सध्या फोन पे ॲपद्वारे वीज, पाणी, गॅस बिले, मोबाईल रिचार्ज किंवा विमा हप्ते भरल्यास प्रत्येक 100 रुपयांच्या खर्चावर 10 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या रिवॉर्ड्सची कमाल मर्यादा दरमहा 2,000 पॉइंट्स आहे. मात्र, 1 जुलैपासून ही मर्यादा दोन भागांत विभागण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार : • विमा प्रीमियम भरण्यावर दरमहा जास्तीत जास्त 500 रिवॉर्ड पॉइंट्स • इतर युटिलिटी व्यवहारांवर जास्तीत जास्त 1,500 रिवॉर्ड पॉइंट्स मिळू शकतील.
ऑनलाइन शॉपिंगवरील फायदा निम्मा
ऍमेझॉन, फ्लिपकार्ड, आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही मोठा फटका बसणार आहे. आतापर्यंत ऑनलाइन शॉपिंगवर मिळणाऱ्या 5 टक्के रिवॉर्ड पॉइंट्सची मासिक मर्यादा 2,000 पॉइंट्स होती. आता ती कमी करून 1,000 पॉइंट्स करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदीवरील बचत पूर्वीपेक्षा कमी होणार आहे.
या व्यवहारांवर मिळणार नाहीत रिवॉर्ड पॉइंट्स
1 जुलैपासून खालील व्यवहारांवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत: • टोल पेमेंट • सोने, चांदी व दागिन्यांची खरेदी • शाळा आणि महाविद्यालयांची फी • PhonePe ॲपच्या बाहेर भरलेली युटिलिटी बिले • PhonePe ॲपच्या बाहेर भरलेले विमा प्रीमियम • PhonePe व्यतिरिक्त इतर माध्यमातून केलेले UPI व्यवहार
काही सुविधा मात्र कायम
रिवॉर्ड पॉइंट्समध्ये कपात झाली असली तरी काही सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. • इतर ऑनलाइन आणि ऑफलाइन खर्चांवर 1 टक्के रिवॉर्ड पॉइंट्स • पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर 1 टक्का इंधन अधिभार माफी • वर्षातून चार वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंज प्रवेश • कोणत्याही खर्चाच्या अटींशिवाय मोफत Priority Pass सदस्यत्व वार्षिक शुल्क किती?
PhonePe SBI Card Select Black साठी : • जॉइनिंग फी : 1,499 रुपये • वार्षिक नूतनीकरण शुल्क : 1,499 रुपये आहे.
ग्राहकांनी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, या कार्डचा वापर मुख्यतः रिवॉर्ड पॉइंट्ससाठी करणाऱ्या ग्राहकांनी नव्या नियमांचा आढावा घ्यावा. विशेषतः युटिलिटी बिल पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगवर जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांच्या बचतीवर या बदलांचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कार्डचा वापर सुरू ठेवायचा की पर्यायी पर्याय निवडायचा, याचा विचार ग्राहकांनी करणे आवश्यक आहे.