भाजपचा 31 वर्षांचा मोडला विक्रम; बांकीपूर बालेकिल्ल्यातून BJP चा दारुण पराभव
बांकीपूर मतदारसंघातून प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय
बांकीपुर/ बिहार (Bankipur By-election Result) : बिहारमधील सर्वात लोकप्रिय बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालात मोठा उलथापालथ झाली आहे. जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी 16,000 हून अधिक मतांच्या फरकाने बांकीपूर जिंकले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. भाजप येथे 31 वर्षांपासून जिंकत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नितीन नवीन (Nitin Navin) यांना आपले बॉस मानत होते. पण यावेळी चित्र पालटले आहे.
मतमोजणीच्या 26 व्या फेरीनंतर, प्रशांत किशोर (Prashant Kishor) 16,887 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत एकूण 55,780 मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार नीरज कुमार 38,893 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आरजेडी नेत्या रेखा कुमारी यांना एकूण 12,461 मते मिळाली आहेत. या जागेवर प्रशांत किशोर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली आहे.
#WATCH | Patna | As he continues his lead in the Bankipur bypoll, Jan Suraaj Chief Prashant Kishor says, "Our first priority after this victory is to honour the blessings and trust that the people of Bankipur have placed in us. We will do everything we can to improve Bankipur.… pic.twitter.com/eNTKiSeIUI
— ANI (@ANI) August 3, 2026प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य
प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले की, लोकांचा विश्वास सार्थ करणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असेल. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे संपूर्ण लक्ष बांकीपूरच्या विकासावर असेल. बांकीपूरच्या लोकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही या भागासाठी पूर्ण ताकदीने काम करू. मला मोठे दावे करायचे नाहीत. केवळ आमदार झाल्याने बांकीपूर रातोरात बंगळूरू बनणार नाही. पण पुढील दोन ते तीन महिन्यांत लोकांना येथे बदलाची सुरुवात नक्कीच दिसेल.
भाजप नेतृत्वाला राजकीय संदेश
प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले की, बांकीपूरचा निकाल (Bankipur By-election) हा केवळ एका जागेचा निर्णय नाही, तर भाजप नेतृत्वाला दिलेला एक राजकीय संदेशही आहे. बांकीपूरच्या जनतेने भाजप नेतृत्वाला बिहारसाठी एक चांगला मुख्यमंत्री पुढे आणण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. जर भाजपला सम्राट चौधरी यांच्या जागी कुशवाहा समाजातील दुसऱ्या नेत्याला आणायचे असेल, तर तो त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. आम्हाला त्यात काही अडचण नाही. पण चेहरा कोणीही असो, तो किंवा ती प्रामाणिक, सक्षम आणि बिहारच्या विकासासाठी काम करणारी असावी.
BJP का 30 साल का किला, 30 दिन में ढ़हा दिया - प्रशांत किशोर. PK ने #Bankipur विधानसभा चुनाव 20,000 वोटों से जीत लिया है।जिस सीट पर भाजपा पिछले 30 सालों से 60% से ज्यादा वोट लेकर जीत रही थी बिहार की उस सीट पर प्रशांत को लगभग 50% वोट मिला और भाजपा का अभेद किला ढह गया।… pic.twitter.com/ATiVUriKCa
— Shubh Tiwari (@shubhspeaks) August 3, 202631 वर्षांचा भाजपचा विक्रम मोडला
बांकीपूर विधानसभा मतदारसंघ (Bankipur By-election) सर्वात मजबूत बालेकिल्ला मानला जातो. भाजपने 1995 पासून ही जागा सातत्याने जिंकली आहे. यावेळीही पक्षाला विजयाचा विश्वास होता. तथापि, सुरुवातीच्या कलांनी राजकीय चित्रच बदलून टाकले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन नवीन (Nitin Navin) यांनी राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली होती. 30 जुलै रोजी मतदान झाले. यावेळी 34.30 टक्के मतदानाची नोंद झाली, जे मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा सुमारे 7 टक्क्यांनी कमी होते.
#WATCH | Bihar | BJP workers in Patna are preparing several kilograms of Ladoos, anticipating the victory of Neeraj Sinha, the party's Bankipur bypoll candidate pic.twitter.com/Q7nXtrvgyK
— ANI (@ANI) August 3, 2026आता 200 किलो लाडूंचं काय होणार?
मतमोजणी सुरू होण्यापूर्वी, भाजप कार्यकर्त्यांनी विजय साजरा करण्यासाठी 200 किलो लाडू तयार केले होते. (Bankipur By-election) निकाल जाहीर होताच समर्थकांमध्ये ही मिठाई वाटण्याची योजना होती. पण जेव्हा सुरुवातीच्या कलांनी पक्ष पिछाडीवर असल्याचे दाखवले, तेव्हा हे लाडू सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले. अनेक वापरकर्ते गंमतीने विचारत आहेत की, निकाल तसाच राहिला तर काय होईल. तर मग या लाडूंचं काय होणार?