Wakodi Child Death: वाकोडीतील वूड्स प्लाय कंपनी पर

वाकोडीतील हृदयद्रावक घटना; पाण्याच्या बादलीत बुडून 11 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

Wakodi Child Death

सावनेर/नागपूर (Wakodi Child Death ) : खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकोडी येथील वूड्स प्लाय कंपनी परिसरात गुरुवारी दुपारी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. पाण्याने भरलेल्या बादलीत बुडाल्याने अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. मृत बालिकेची ओळख संध्या मंजीत टेकाम अशी झाली आहे.

खेळताना घडला अपघात

प्राथमिक माहितीनुसार, संध्या खेळत असताना ती पाण्याने भरलेल्या बादलीत पडली. पाण्यात बुडाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही (Wakodi Child Death) घटना अत्यंत वेदनादायक असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रुग्णालयात नेले; डॉक्टरांनी मृत घोषित

घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिजन व स्थानिकांच्या मदतीने बालिकेला तात्काळ सावनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह नागपूर येथे पाठविण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना कंपनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावरून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, याच कंपनी परिसरात काही महिन्यांपूर्वी आग लागण्याची घटना घडली होती. त्यामुळे येथे असलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खापा पोलीस करत असून, (Wakodi Child Death) अपघाताचे नेमके कारण व परिस्थिती तपासली जात आहे. ही घटना लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे.