हिंगोलीत अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
हिंगोली (Hingoli Unknown Male Death) : शहरातील सावरकर नगर येथील हनुमान मंदिराजवळ 22 मे रोजी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी एक अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती देताच 108 रुग्णवाहिकेतून त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय, हिंगोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच 23 मे रोजी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 24 मे रोजी आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
मयत इसमाचे वय अंदाजे 60 वर्षे असून वर्ण सावळा, बांधा सडपातळ व उंची 5 फूट 8 इंच आहे. त्याने काळ्या रंगाची स्पोर्टची हाफ चड्डी परिधान केली होती, ज्यावर दोन्ही बाजूंना लाल रंगाचे पट्टे आहेत. त्याच्या उजव्या हातात काळ्या रंगाचा बेल्ट होता. दोन्ही पायांच्या गुडघ्याखाली पांढऱ्या रंगाचे कोड असून डोक्याचे केस आणि दाढी काळी-पांढरी आहे. (Hingoli Unknown Male Death) सदर अनोळखी मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास हिंगोली शहर पोलीस ठाणे 8669900678, पोलीस निरीक्षक संदीप मोदे 8108271166 किंवा तपासीक अंमलदार भिमराव चित्तारे 9850880856 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.