अज्ञात वाहनाच्या धडकेत जख्मी अनोळखी इसमाचा मृत्यु
ओळखत असणा-यानी कन्हान पोलीस स्टेशनला संपर्क करावा
कन्हान (Kanhan Man Death) : पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी रेल्वे स्टेशन परिसरातील नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जख्मी झालेल्या एका अनोळखी इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार, डुमरी रेल्वे स्टेशनजवळील हरियाणा ढाब्याजवळ मागिल १० ते १५ दिवसांपासुन एक अनोळखी इसम फिरत होता. तो (Kanhan Man Death) मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसुन येत होते व परिसरात अन्न मागुन आपली उपजीविका करत होता. १६ मे रोजी रात्री ११. ४५ वाजता अज्ञात वाहनाने जोरदार धडक मारली. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यास तत्काळ मेयो रुग्णालय नागपुर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. मृत इसमाचे (Kanhan Man Death) वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष असुन त्याचा रंग सावळा, डोक्यावरील केस पिकलेले असुन चेहऱ्या वर पांढरी दाढी व मिशी आहे. अंगात फाटलेले कपडे असुन हात-पायांची नखे वाढलेली होती. सदर मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसुन त्याची ओळख कोणाला असल्यास त्यांनी तात्काळ कन्हान पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे हयांनी केले आहे.