Young Man Death: दुचाकी डिव्हायडरला धडकली; तरुणाचा मृत्यू
राजगाव पेट्रोलपंप परिसरातील अपघात
फाळेगाव (Young Man Death) : वाशिमवरून कनेरगावकडे जाणाऱ्या दुचाकीचा राजगाव येथील पेट्रोलपंप परिसरात डिव्हायडरला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १२ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या (Young Man Death) अपघातात दुचाकीवरील दुसरा एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेला तरुण गणेश मोतीराम वैद्य (वय ३२, रा. फाळेगाव, ता. जि. हिंगोली) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाशिम ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गणेश वैद्य हे टिळ्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने वाशिमवरून आपल्या गावी जात असताना राजगाव येथील पेट्रोलपंपाजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी थेट रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली. धडक जोरदार असल्याने गणेश वैद्य यांना गंभीर दुखापत झाली. (Young Man Death) अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दुचाकीवरील दुसरा व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. (Young Man Death) घटनेची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पुढील तपास सुरू आहे.