Parbhani Illegal Sand: गंगाखेड पोलीस ठाण्यात अवैध

परभणीत अवैध वाळू उपसा करणारे तीन सक्षण इंजिन पंप जप्त; तीन तराफे जाळून केले नष्ट

Parbhani Illegal Sand

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धाडसी कारवाई....!

परभणी (Parbhani Illegal Sand) : गंगाखेड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवठाणा येथील गोदावरी नदी पात्रातून सक्षण इंजिन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार २५ मे रोजी कारवाई करत तीन सक्षण इंजिन पंप जप्त करून पोलीस ठाण्यात आणले तर तीन तराफे जाळून नष्ट केले आहे. एक तराफा तलाठी यांच्या ताब्यात दिला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवठाणा येथील गोदावरी नदी पात्रातून सक्षण इंजिन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि श्रीधर जगताप, पोउपनि चंदनसिंह परिहार, पोह महेश कवठाळे, माणिकराव वाघ, राहुल परसोडे, सचिन भदरगे, सूर्यकांत फड, गजानन क्षिरसागर, पोशि दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत आदींनी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार २५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान देवठाणा गोदावरी नदी पात्रात छापा मारून कारवाई करून अंदाजे सहा लाख रुपये किंमतीचे तीन सक्षण पंप जप्त करून गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा केले तर एक तराफा देवठाणा येथील तलाठी यांच्या ताब्यात देत तीन तराफे जाळून नष्ट केले.

पोलीस आल्याची कुणकुण लागताच वाळू माफिया (Parbhani Illegal Sand) व मजूर पळून गेले. याप्रकरणी पोह माणिकराव वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात सचिन रमेश जोगदंड रा. देवठाणा, कृष्णा रामराव पवार रा. वझुर, भारत कोंडीबा गायकवाड, प्रकाश भाकरोबा कदम दोघे रा. खुर्लेवाडी या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईने वाळू माफियांचे धाबे दनाणले आहे.