journalist Death Threat: परभणी शहरातील जाम नाका जि

परभणीच्या कोतवाली हद्दीत पत्रकाराला कटर दाखवत जीवे मारण्याची धमकी

journalist Death Threat

जाम नाका परिसरातील घटना; आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

परभणी (journalist Death Threat) : शहरातील जाम नाका परिसरात एका पत्रकाराला धारदार लोखंडी कटर दाखवत जीवे मारण्याची धमकी (journalist Death Threat) दिल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून झालेल्या या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.२०) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात राहणारे पत्रकार मो. नजीब सिद्दिकी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा सख्खा मावसभाऊ अय्युब खान बाबू खान पठाण (रा. पीरबुऱ्हाणनगर गल्ली क्र. ७, वर्कशॉप कॉर्नर परिसर, नांदेड) याने फोन न उचलल्याच्या कारणावरून यापूर्वी शिवीगाळ केली होती.मंगळवारी (दि.१९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जाम नाका-जिंतूर रोड परिसरात दोघांची भेट झाली.

यावेळी “माझा फोन का उचलला नाही” या (journalist Death Threat कारणावरून आरोपीने पत्रकारास अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील शेरा नावाच्या व्यक्तीने हा वाद सोडविल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.मात्र जाताना आरोपीने धारदार लोखंडी कटर दाखवत “खतम करून टाकतो” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी अय्युब खान पठाण याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रायव्हरकडे पत्रकार म्हणून ओळखपत्र...?

या प्रकरणातील आरोपी अय्युब खान पठाण हा व्यवसायाने ड्रायव्हर असून टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे चारचाकी वाहन चालवत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याच्याकडे एका सोशल मीडियाच्या नावाचे पत्रकार ओळखपत्र आढळल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. संबंधित ओळखपत्राचा वापर नेमका कुठे व कोणत्या कारणासाठी केला जात होता, याचीही पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे.