परभणीत ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणारे चोरटे जेरबंद...!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तीन गुन्ह्यांची उकल...!
परभणी (Parbhani Tractor-Trolley Theft) : मागील काही दिवसात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून ट्रॅक्टर ट्रॉली, शेती आवजारे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणार्या चोरट्यांना जेरबंद केले आहे. तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांचा शोध घेत असताना सीसीटिव्ही फुटेजची पाहणी, गुन्हा करण्याची पध्दत याचा बारकाईने तपास करण्यात आला. ८ जुलै रोजी गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरट्यांविषयी गोपनीय माहिती मिळाली. यावरुन ज्ञानेश्वर सुनील लोहट, माणिक हरीभाऊ जोध या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी मागील दिड महिन्यात आपल्या साथीदारासोबत मिळून परभणी तालुक्यातील मोहपुरी, मानवत रोड, कोकर कॉलनी या 'िकाणाहून स्वत:च्या ट्रॅक्टरचे हेड वापरत जुन्या ट्रॉल्या चोरी केल्याचे सांगितले.
या ट्रॉल्या विक्री केलेल्या इसमांकडून जप्त करण्यात आल्या. परभणी ग्रामीण मधील एक व मानवत पोलीस स्टेशनमधील दोन अशा तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ही कारवाई स्थागुशाचे सपोनि. अशोक जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. चंदनसिंह परिहार, गणेश सवंडकर, पोलीस अंमलदार विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, मधुकर ढवळे, गजानन क्षिरसागर, विष्णू चव्हाण, हनुमान ढगे, हनवते, इमरान, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी यांच्या पथकाने केली.