Parbhani sand mafia: पूर्णा पोलीस ठाण्याचा कारभार

परभणीत वाळु माफियांना दणका; नदीपात्रातील बोटी स्फोटकाने उडविल्या..!

Parbhani sand mafia

पुर्णा नदीपात्रात पिंपळगाव (बा) येथे पोलीसांची कारवाई; दोन पोकलेन जप्त 

परभणी (Parbhani sand mafia) : पूर्णा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेताच नवनियुक्त पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी  पहिल्याच दिवशी वाळु माफियांवर कारवाई धडक कारवाई केली आहे.   बुधवार  २० मे रोजी दुपारी पिंपळगाव (बा) शिवारातील पूर्णा नदीपात्रात चालू असलेल्या अवैध वाळू उपशावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपये किमतीच्या दोन  पोकलेन मशीन जप्त केल्या.  तसेच नदीपात्रात उतरवलेल्या ५ अवैध सक्शन बोटी जिलेटिनच्या साहाय्याने स्फोटाने नष्ट केल्या. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्ह्यात पदभार घेतल्यापासून (Parbhani sand mafia) अवैध धंदे चालकाविरुध्द मोहिम सुरु केली आहे.  त्यांच्या  सूचनेवरून पूर्णा पोलीस ठाण्यात हजर झालेले नवीन पोनि. सचिन बेंद्रे यांनी   पोलीस उपनिरीक्षक इंगोले, पोह. शेख ताजोद्दीन, पोशि. माधव आक्कलवाड यांचे विशेष पथक तयार केले. बुधवार, २० मे रोजी दुपारी सव्वा एक च्या सुमारास पिंपळगाव (बा) शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून कोणतीही परवानगी नसताना  यंत्रसामग्री लावून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून वाळू चोरी सुरू असलेल्या ठिकाणाला पोलिसांनी अचानक वेढा घातला. (Parbhani sand mafia) पोलिसांची गाडी पाहताच नदीपात्रात बेकायदेशीर काम करणारे दोन्ही पोकलेन चालक आणि बोटीवरील मजूर कारवाईच्या भीतीने यंत्रसामग्री घटनास्थळावरच सोडून पसार झाले. या प्रकरणी पोलीस शिपाई माधव धोंडीबा आक्कलवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पोकलेन चालक व बोट मालकांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगोले  करीत आहेत. 

अवैध धंदे चालवणार्‍यांची गय केली जाणार नाही  -पोनि सचिन बेंद्रे

पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली (Parbhani sand mafia) अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पूर्णा पोलीस ठाणे  हद्दीत यापुढे कोणताही अवैध वाळू उपसा,   जुगार, गावठी दारू किंवा कुठलेही बेकायदेशीर धंदे चालणार नाहीत.   कायदा तोडणार्‍यांवर  कठोर कारवाई केली जाईल.