Parbhani Pistol Weapon: लोकांमध्ये भिती निर्माण कर

परभणीत पिस्तूल सारखे शस्त्र घेऊन फिरणार्‍याला घेतले ताब्यात...!

Parbhani Pistol Weapon

लोकांमध्ये भिती करण्याचा उद्देश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

परभणी (Parbhani Pistol Weapon) : लोकांमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्तूल सारखे दिसणारे लोखंडी लायटर कंबरेला लावून फिरणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई ४ जून रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास परभणी तालुक्यातील झरी येथे करण्यात आली. सदर प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते.

या (Parbhani Pistol Weapon) पथकाला झरी येथे एक तरुण सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या ताब्यात विना परवाना बेकायदेशीरित्या पिस्तूल सारखे दिसणारे लोखंडी लायटर कंबरेला लावून लोकांमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरुन पथकाने कारवाई करत मधूकर उर्फ भावड्या सदाशिव साबळे याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळून पिस्तूल सारखे दिसणारे लायटर जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोह. प्रविण घोंगडे यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. रोडे करत आहेत.

तलवार बाळगणार्‍याला घेतले ताब्यात परभणी : विना परवाना बेकायदेशीर रित्या स्वत:च्या ताब्यात तलवार बाळगणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ४ जून रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास खंडाळी रो ता. गंगाखेड येथे कारवाई करण्यात आली. पोशि. शरद सावंत यांच्या फिर्यादीवरुन सुमित जंगले याच्यावर पिंपळदरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.