परभणीत शेत जमिनीच्या वादात खून चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात..!
स्थानिक गुन्हे शाख पथकाची कारवाई परभणी,छत्रपती संभाजीनगर येथून पकडले
परभणी (Parbhani murder case) : गंगाखेड येथे शेत जमिनीच्या वादातून भाऊसाहेब जाधव यांचा खून झाला. या प्रकरणी रविवार १४ जून रोजी रात्री उशीरा सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या खुनात सहभागी असलेल्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी, छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना सोनपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. गौडगाव - ब्रम्हनाथवाडी शिवारात शेत जमिनीच्या वादातून भाऊसाहेब किशनराव जाधव यांचा खून करण्यात आला. आरोपी पसार झाले. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांची माहिती काढली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशाने स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अशोक जायभाय, पोउपनि. चंदनसिंह परिहार, मधुकर चट्टे, सपोउपनि. सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोलीस अंमलदार महेश कौठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, नेताजी गिते, अनिता राठोड, उत्तम हनवते, दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत यांच्या पथकाने शोध घेतला. फरार आरोपी दिलीप ब्रम्हनाथकर याला परभणी (Parbhani murder case) येथून तर मिरा रमेश कुलकर्णी, गणेश रमेश कुलकर्णी, नागेश नेताजी ब्रम्हनाथकर या तिघांना छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणात मयताचा मुलगा व्यंकटेश जाधव याच्या तक्रारीवरुन सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंद आहे.
आरोपींशी बोलणारा तो पोलीस कोण? घटना घडल्यानंतर आरोपी पसार होण्याच्या तयारीत होते. रविवारी दुपारी २:३४ मिनिट ते २ : ४० मिनिट या वेळेत एक पोलीस कर्मचारी सदर आरोपींशी बोलत होता. नेमका हा पोलीस कोण? त्याचे आरोपी सोबत काय बोलणे झाले? याचा शोध घेणेही आवश्यक आहे. (Parbhani murder case) पोलीस आरोपीशी बोलत असल्याने गंगाखेड शहरात उलटसूलट चर्चांना उधाण आले आहे.