Manwat Police Action: परभणी जिल्ह्यातील एक बेकायदे

परभणी जिल्ह्यातून हद्दपार इसमाचा मानवत शहरात वावर

Manwat Police Action

मानवत पोलिसांच्या पथकाने महाराणा प्रताप चौकातून घेतले ताब्यात

परभणी (Manwat Police Action) : जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला इसम कोणतीही परवानगी न घेता मानवत शहरात फिरताना आढळून आला. संबंधिताला मानवत पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवार ९ जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास करण्यात आली.  मानवत पोलिसांचे पथक गस्तीवर असताना या (Manwat Police Action) पथकाला जिल्ह्यातून हद्दपार पवनसिंग गब्बुसिंग बावरी हा इसम मानवत शहरात येण्याची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या शहरामध्ये फिरत आहे, अशी माहिती मिळाली. यावरुन पोनि. दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बिक्कड, सपोउपनि. भरत नलावडे, पोलीस अंमलदार सुनीलसिंग बावरी, अविनाश डंबाळे, बेडे, पकाणे यांच्या पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेतले. त्याला माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे.