परभणीत जुन्या वादात तिघांवर तलवार, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला....!
मानवत तालुक्यातील गोगलगाव पाटी जवळील घटना....!
परभणी (Parbhani fatal Attack) : मानवत येथील जुन्या भांडणाच्या कारणावरुन डोळ्यात मिरची पुड टाकून तलवार, लोखंडी रॉडने तिघांना जबर मारहाण करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना ४ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास मानवत तालुक्यातील गोगलगाव पाटीजवळ घडली. सदर प्रकरणी मानवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन रमेशराव पाथरकर यांनी तक्रार दिली आहे. त्यांचे मागील एक ते दिड महिन्यापूर्वी गावातील व्यक्तींसोबत गाडी लावण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. या (Parbhani fatal Attack) प्रकरणात सेलू पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. ४ जुनच्या रात्री फिर्यादी मानवत येथून गोगलगावकडे जात असताना कृष्णा मगर यांचा फोन आला. तु घराजवळ ये, तुला बोलायचे आहे, असे म्हणाला. यानंतर फिर्यादी त्यांचे मोठे भाऊ केशव आणि चुलता विष्णू हे जि.प. शाळा गोगलगाव समोर आले.
या ठिकाणी आरोपींनी संगणमत करत डोळ्यामध्ये मिरची पुड टाकून तलवार, लोखंडी रॉड, काठीने फिर्यादी, त्यांचे भाऊ आणि चुलत्यावर (Parbhani fatal Attack) जीवघेणा हल्ला केला. जीवे मारण्याच्या उद्देशाने सदर हल्ला करण्यात आला. जखमींना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दिलेल्या तक्रारी वरुन गोपाळ मगर, कृष्णा मगर, अजय उर्फ आदिनाथ, नवनाथ मगर, आबासाहेब मगर, मनकर्णा मगर, सिमा यांच्यावर मानवत पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.