परभणीत कोम्बींग ऑपरेशन; फरार आरोपी ताब्यात...!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दैठणा,सेलू पोलीस ठाण्यातील गुन्हे
परभणी (Parbhani Combing Operation) : घरफोडी, चोरी सारख्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. दैठणा, सेलू पोलीस ठाणे हद्दित दाखल गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आले आहे. कोम्बींग ऑपरेशन दरम्यान स्थागुशाच्या पथकाने सदर कारवाई केली. दैठणा पोलीस ठाणे हद्दित दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात तेजसिंग सुरजसिंग भोंड हा आरोपी फरार होता. त्याचा शोध घेत ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी दैठणा पोलिसात हजर करण्यात आले आहे. तर सेलू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कन्हैय्यासिंग धारासिंग दुधाणी याला परभणीतील साखला प्लॉट येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अशोक जायभाय, पोउपनि. मधुकर चट्टे, सपोउपनि. सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोलीस अंमलदार नेताजी गिते, तुपसुंदर, बुधवंत, हनवते, केशव लटपटे, विलास सातपुते, रवि जाधव, सुर्यकांत फड, सिध्देश्वर चाटे, विष्णू चव्हाण, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, राम पौळ यांच्या पथकाने केली.