Parbhani Child Marriage: पालम तालुक्यातील १६ वर्षी

परभणीत बाळाला जन्म दिल्यानंतर फुटले बालविवाहचे बिंग

Parbhani Child Marriage

पालम पोलिसात गुन्हा दाखल; पतीला अटक इतर चौघांचा शोध सुरू

परभणी (Parbhani Child Marriage) : पालम तालुक्यातील   बाळाला जन्म दिल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या बालविवाहचे बिंग फुटले. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आली असून इतर चौघांचा शोध सुरू आहे.  या (Parbhani Child Marriage) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पालम तालुक्यातील मौजमाबाद येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आला. त्यानंतर सदर मुलगी गरोदर राहिली. या मुलीने बाळाला जन्म दिला. पिडित मुलगी ही अवघी १६ वर्ष ११ महिने वयाची असताना तिचा बालविवाह लावण्यात आला. त्यानंतर पतीने सदर मुलीसोबत संबंध ठेवले. गरोदर राहिल्यानंतर बालविवाहचे बिंग फुटले या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन पती, सासु, सासरे व इतर दोघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पोनि. आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीराम चिटेवार तपास करत आहेत.