परभणीत कत्तलीसाठी गोवंशाची वाहतुक करणार्या दोघांना अटक
वाहन,पशुधनासह साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त बोरी पोलिसांची कार्यवाही
जिंतूर (Parbhani cattle slaughter) : तालुक्यातील बोरी येथे कत्तल करण्याच्या हेतूने चार बैल व एका गाईची बेकायदेशीररित्या अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पशुधनासह बोलेरो पिकअप असा एकूण साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बोरी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि. रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २१ मे रोजी सापळा रचून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास परभणी रोडवरील दीक्षाभूमी समोर वाहनाची तपासणी केली. या तपासणी दरम्यान सदर वाहनात चार बैल व एक गाय अतिशय क्रूर पद्धतीने आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. कोणत्याही प्रकारचा चारा पाणी न देता ही अवैध वाहतूक होत असल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांच्या लक्षात आले. या कार्यवाहीत पोलिसांनी रियाज जाकीर कुरेशी वय २४ वर्षे रा. साबळे गल्ली, जिंतूर आणि तौफिक मुसा कुरेशी वय ३२ वर्षे रा. फतन प्लॉट, जिंतूर यांना त्यांचे वाहन बोलेरो पिकअप (एम एच ०४ जे के ५२३२) सह ताब्यात घेतले आहे. या दोघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा नुसार गुन्हा नोंद केला आहे. सपोनि रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश जटाळ, प्रकाश मोरे, श्रीराम दंडवते, शेख वसीम यांनी ही कार्यवाही केली. (Parbhani cattle slaughter) दरम्यान सदर प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.बोरी पोलिसांनी सापळा रचून अतिशय शिताफीने धाडसी कार्यवाही केली; त्याबद्दल बोरी पोलिसांचे नागरिकातून कौतुक होत आहे.
गोमातेची कत्तल नको दरम्यान हिंदू धर्मात गाईला देवासमान व मातेसमान दर्जा दिला जातो. त्यामुळे गाईची कत्तल करणार्यांवर कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे, असे मत हिंदू समाजातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.