wife Harassment case: लग्नानंतर पैसे व इतर वस्तुंच

पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा छळ

wife Harassment case

सासरच्या मंडळीवर नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल

परभणी (wife Harassment case) : लग्नानंतर पैसे व इतर वस्तुंची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासरे, दोन नणंद व दोन नंदव्या अशा सहा जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ऋतुजा बिर्‍हाडे यांचा विवाह   २०२४ मध्ये पनवेल येथील ऋषीकेश बिर्‍हाडे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर  फिर्यादी सासरी नांदण्यासाठी गेल्यानंतर आरोपी पती ऋषीकेश बिर्‍हाडे, सासरे भाऊसाहेब   बिर्‍हाडे, मोठी नणंद मिताली  होवाळ, धाकटी नणंद अंकिता मरवडे तसेच नंदई विशाल होवाळ व रघूनाथ मरवडे यांनी माहेराहून पैसे, फॉर्च्युनर कार, सोने आणण्याची मागणी  केली.

मागणी पूर्ण न केल्याने फिर्यादीला क्षुल्लक कारणांवरून  सतत अपमानित करत मारहाण करण्यात आली. या (wife Harassment case) प्रकरणी फिर्यादी ऋतुजा ऋषीकेश बिर्‍हाडे  यांच्या फिर्यादीवरून शनिवार ४ जुलै रोजी पती ऋषीकेश भाऊसाहेब बिर्‍हाडे, सासरे भाऊसाहेब राजाराम बिर्‍हाडे, मिताली विशाल होवाळ, अंकिता रघूनाथ मरवडे, विशाल संपत होवाळ आणि रघूनाथ मारोती मरवडे यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.