Illegal firearm seized: वसमत तालुक्यातील भेंडेगाव

कुरुंदा पोलिसांची कारवाई; चार जिवंत काडतुसासह अवैध अग्निशस्त्र जप्त, आरोपी जेरबंद

Illegal firearm seized

वसमत/ कुरूंदा (Illegal firearm seized) : वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात अवैध अग्निशस्त्र अनाधिकृत रित्या बाळगणार्‍या एका तरुणाला कुरुंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे भेंडेगाव सारख्या गावात अवैध अग्निशस्त्र बाळगल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे हे कोणाकडून खरेदी केले त्याचा शोध पोलीस घेत आहेत. वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात एका तरुणाजवळ अवैध अग्निशस्त्र असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना लागली सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या पोलीस हवालदार भगीरथ सवंडकर संतोष थोरात भगवान वडकिले भुरके, बालाजी वडगावे यांचे पथक परिसरात दाखल झाले कसून शोध घेतल्यानंतर भेंडेगाव परिसरातील शेतात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शनिवारी सकाळी कारवाई केली भेंडेगाव शिवारातील शेतात आरोपीला ताब्यात घेण्यात आले आरोपी जवळून अवैध अग्निशस्त्र चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत  याप्रकरणी पोलीस नाईक बालाजी गोविंदराव वडगावे  यांच्या तक्रारी वरून विक्रम दत्ता सोनटक्के रा. भेंडेगाव ता. वसमत याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपीकडून  अवैध अग्निशस्त्र ज्यात एक लोखंडी मॅग्झीन असलेली पिस्टल ग्रीपवर दोन्ही बाजूने काळ्या रंगाच्या पट्या आहेत स्ट्रीगर गार्ड लावलेले आहे  चार जिवंत काडतूस दोन काडतूसवर ७.६५ के. एफ. असे नाव असलेले  व चार काडतूस असा एकुण ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड करत आहेत.  जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण, अप्पर पोलिस अधिक्षक कमलमेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी, राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरूंदा पोलिसांनी ही कामगिरी यशस्वी केली.  पिस्तोल खरेदी कोणाकडून वसमत तालुक्यात अवैध अग्निशस्त्र सापडण्याच्या घटना वाढल्या आहेत वसमत शहरातही यापूर्वी अवैध अग्निशस्त्र जप्त करण्यात ही कारवाई करण्यात आली आता भेंडेगाव सारख्या छोट्याशा गावात अवैध अग्निशस्त्र व काडतूस जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे अवैध अग्निशस्त्र खरेदी कोणाकडून होते हे मात्र अद्याप पर्यंत बाहेर आले नाही त्यामुळे विकणारी टोळी उघड झालेली नाही पोलिसांनी या प्रकारात कोणाकडून खरेदी झाली तिथपर्यंत शोध घेऊन अजून किती जणांना असे पिस्तूल विकण्यात आले याचा शोध घेऊन  विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे .