Wasmat burglary case: महाराष्ट्रातील वसमतमध्ये एका

वसमत मध्ये घरफोडी दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला

Wasmat burglary case

महाराष्ट्र दर्शनासाठी गेले होते कुटुंबीय 

वसमत (Wasmat burglary case) : वसमत येथील शिवाजीनगर भागातील एका घरात  चोरट्यांनी चोरी करून दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वसमत येथील शिवाजीनगर भागातील रहिवासी एकनाथ गंगाधर काळे वय 36 वर्ष व्यवसाय नौकरी  यांनी तक्रार दिली की दिनांक 23 मे रोजी सकाळी 06.00 ते  25.05.मे चे 01.30 वाजण्याच्या दरम्याण  शिवाजी नगर  येथील राहत्या घरातून चोरट्याने घरफोडी केली कपाटातील व लोखंडी पेटीतील नगदी रुपये व सोन्याचे दागिने ज्यामध्ये 6 ग्रॅम सोन्याचे लॉकेट, 12 ग्रॅम कानातील सोन्याचे झुमके एक ग्रॅम सोन्याची नथ, 1 ग्रॅम सोन्याचे मणी 01 ग्रॅम सोन्याची अंगठी असे एकुन 21 ग्रॅम सोन्याचे दागीने , 10 तोळे चांदीचे दागीने आणि नगदी 8000- रु असा एकुन 2, लाख 18,000 रु चा मुद्देमाल  चोरट्यांनी चोरून नेला आहे. या (Wasmat burglary case) तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कसबेवाड करत आहेत.