परभणीतील जिंतुरात घरफोडी...दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या बंद घरावर चोरट्यांनी मारला डल्ला
जिंतूर (Jintur Burglary Case) : घराला कुलूप लावून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या लिपिकाचे घर फोडत चोरट्यांनी २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना जिंतूर शहरातील खैरी प्लॉट भागात घडली. सदर प्रकरणी १४ जुनला (Jintur Burglary Case) जिंतूर पोलिसात अनोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. प्रशांत सुधाकरराव लाखे हे बहिण, भाऊजी आणि परिवारासह देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. १३ जुनच्या मध्यरात्री एकच्या सुमारास ते देवदर्शनाहून परत आले. यावेळी त्यांना घराच्या खोल्यांचे दरवाजे उघडे दिसले. आत जावून पाहणी केल्यावर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. (Jintur Burglary Case) चोरट्यांनी घरातून सोन्याचे झुंबर, सोन्याची वेल, रोख रक्कम मिळून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले. या प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.