हिंगोलीत पोलिसांनी पाठलाग करून कारसह गुटखा जप्त
अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli Gutkha Seized) : शहरातील सुर्यमूखी हनुमान मंदिराजवळ एका कारमधून शासनाने बंदी घातलेले गुटखा नेण्यात येत असताना अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने २१ मे रोजी कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु कार पळवून नेताना पोलिसांनी पाठलाग करून कारसह गुटखा असा एकुण १० लाख ६ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. २१ मे रोजी पेन्शनपुरा भागात एका कारमधून गुटखा येत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यावरून सुर्यमुखी हनुमान मंदिराजवळ कार क्रमांक एमएच ३८ एके ३९०५ ही येताच पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु कार पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी पाठलाग करताच आरोपीने गल्लीबोळाचा सहारा घेऊन कार उभी करून पलायन केले. यामध्ये पोलिसांनी ८ लाख रुपयाची कार १ लाख ३२ हजार रुपयाचा विमल पान मसाला, ९६८० रुपयाचा व्ही वन तंबाखू, ४८ हजार रुपयाचा केसरयुक्त विमल पान मसाला, २ हजाराचा व्ही वन विंग, १५ हजाराचा मोबाईल असा एकुण १० लाख ६ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या (Hingoli Gutkha Seized) प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात सतिष नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष नरवाडे, संदिप पवार, सुमित टाले, विनोद कुटे, अर्जुन यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास अशोक धामणे हे करीत आहेत.