Hingoli DJ crime

पोलिसांच्या नोटीसचे उल्लंघन, डिजे वाजविल्याने पाच जनांवर गुन्हा दाखल

Hingoli DJ crime

हिंगोली (Hingoli DJ crime) : धर्मवीर राजे संभाजी महाराज जयंती निमित्ताने शहरामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने भव्य मिरवणूकीचे आयोजन गुरूवारी केले होते. या मिरवणुक निमित्ताने पोलिसांनी दिलेल्या नोटीसचे पालन न करता डिजे वाजविल्याने पाच जनांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.  १४ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक निमित्ताने पोलिसांनी दिलेल्या कलम १६८ च्या नोटीसचे पालन न करता डिजेचा आवाज कमी न करता डिजे चालू ठेवल्याने हिंगोली शहर पोलिसात भुजंग तोडेवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Hingoli DJ crime) डिजे वाहन क्रमांक एमएच १२ एफझेड ९९४१ चा चालक डिजे मालक केशव शिवाजी जाधव, डिजे वाहन क्रमांक एमएच २६ एडी०२५५ चा चालक, डिजे वाहन मालक आशिष केशव गरड तसेच आयोजक विनायक श्रीराम भिसे हिंगोली या पाच जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास जी.आर. पोटे हे करीत आहेत.